ठाणे : भाजपने  सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या कल्याण डोंबिवली  महापालिकेतील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ चक्क पैशांचे वाटप केल्याचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेन उघडकीस आणल आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान पांढऱ्या पाकिटात ३००० रुपये म्हणजे ५०० रुपयांच्या ६ नोटा टाकून हे पैसे वाटप केले जात होते. डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपकडून तीन हजार रुपयांची पाकीटे नागरिकांच्या घरी पोहोचवण्यात येत होते अशी माहीती मिळताच येथील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ हात पकडल्याने हे उघडकीस आलं आहे.

या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, येथील प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत आहे. भाजपाचे विशू पेडणेकर यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचं समोर आलं आहे, विशेष म्हणजे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेचे हा व्हिडिओ बनवून हा पैसे वाटपाचा डाव उधळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *