निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचा रूटमार्च
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेत पोलिसांच्या वतीने  रूटमार्च काढण्यात आला. कल्याण मधील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा रूटमार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये १०० हून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून विशेषता संवेदनशील ठिकाणी हा रूटमार्च काढण्यात आला. नागरिकांनी भयमुक्त वातावरणात आपला लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावण्याचे  आवाहन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *