महायुतीचा ‘वचननामा‘ जाहीर ०

 वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत ० २४ तास पाणी ०  

लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपा, एकनाथ शिंदें यांची शिवसेना आणि रामदास आठवलेंची आरपीआय यांच्या महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा वचननामा प्रसिद्ध केला. महायुतीच्या या वचननाम्यात पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित करणे, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणे, लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, झोपडपट्टीमुक्त मुंबई, ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करणे, तसेच, धारावीचा विकास आदी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतर कुणीही वचननामा दिला तरीही त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड मोठा असेल. पुढील पाच वर्षानंतर आम्ही कायकाय केलं याचा एक रिपोर्ट जनतेसमोर आम्ही मांडू. आम्ही मुंबईकरांना मुंबईबाहेर जाऊ देणार नाही. काही लोक बोलत राहिले आम्ही मात्र करून दाखवलं. बीडीडी, अभ्युदय नगर, विशाल सह्याद्री नगर याचे उदाहरण आहे.हा वचननामा मुंबईकरांच्या दररोजच्या जीवनात बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे एक वर्ष, आम्ही मुंबईत जे काम केले, ते आपल्यासमोर आहेच. मुंबईच्या विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आमची जबाबदारी आहे. वचन आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर आम्हला पुन्हा एकदा मुंबईत आणायचा आहे असा शब्द शिंदे यांनी दिला.

महायुतीच्या वचननाम्यातील काही महत्त्वाचे मुद्दे –
– 
पाच वर्षासाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देणार.
– 
मुंबईला पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पुढील  वर्षात गारगाईपिंजाळदमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
– 
लघु उद्योग धोरण राबवले जाणार
– 
पुनर्विकासाला जलदगती देणारपागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी जाहीर केलेली योजना जलदगतीने राबविणार
– 
बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस
– 
बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत
– 
लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी  लघु उद्योग स्थापन करण्यासाठी  लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
– 
रोहिंग्या  बांगलादेशी मुक्त मुंबई करणार
– 
बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
photot caption

मुंबई महानगर पालिकेसाठी महायुतीचा वचननामा जाहिर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरपीआयचे रामदास आठवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *