शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण हटाव भूमिकेवरून रोहिदास मुंडे यांना अनेक ग्रामस्थांचा पाठिंबा
प्रचारादरम्यान रोहिदास मुंडे यांना ज्येष्ठ नागरिक व महिलांचे आशीर्वाद
दिवा:- प्रभाग क्रमांक २८ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रोहिदास मुंडे यांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या भूमिकेला स्थानिक नागरिकांनी जोरदार पाठिंबा दर्शवला असून स्थानिक नागरिकांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्याच्या मुद्द्यावरून दिवा प्रभाग क्रमांक २८ मधील अनेक ग्रामस्थांनी रोहिदास मुंडे यांना पाठिंबा दर्शवला आहे.
रोहिदास मुंडे यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत होत असून त्यांच्या प्रचारामध्ये सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. रोहिदास मुंडे यांना आशीर्वाद देण्यासाठी जेष्ठ नागरिक, वृद्ध महिला देखील पुढाकार घेत असून यावेळी सर्वसामान्य कुटुंबातील तरुण हा आमचा नगरसेवक व्हावा अशी भावना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहेत. दिवा शहरासाठी लढणारा आणि लढाऊ बाणा असणारा उमदा तरुण नगरसेवक व्हावा व दिवा शहराच्या रक्षणासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी भावना मतदार व्यक्त करताना दिसत आहेत. रोहिदास मुंडे यांच्यासोबत ज्योती पाटील व योगेश निकम हे देखील प्रभाग २८ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे आहेत.
