५१व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर.
परभणीच्या अतुल जाधवकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा.
मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशीएशनने ५१व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता आपला संघ घोषित केला. परभणीच्या अतुल जाधवकडे या संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे १५ ते १८ जानेवारी या कालवधीत ही स्पर्धा होईल. बारामती, पुणे येथे मुंबई उपनगरचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू गिरीश पवार याच्या मार्गदर्शनाखाली या संघाचे सराव शिबीर सुरु होते. या निवडण्यात आलेल्या संघात परभणी, अहमदनगर, कोल्हापूर, ठाणे ग्रामीण व पालघर या जिल्ह्याचे २-२ खेळाडू, तर मुंबई शहर, पुणे ग्रामीण, पुणे शहर व रत्नागिरी या जिल्ह्याचे १-१ खेळाडूंची वर्णी लागली आहे. हा संघ १३ जानेवारी दुपारनंतर मुंबईतील महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या कार्याल्यात येईल. त्यानंतर १४ जानेवारी सकाळी ६-५५ च्या एल. टि. टि. – विशाखापट्टनम एक्सप्रेसने विजयावाडा येथे स्पर्धेकरिता रवाना होईल. अशी माहिती संघाची घोषणा संघटनेचे सचिव बाबूराव चांदेरे यांनी केली. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.
कुमार गट संघ :- १)अतुल जाधव – संघनायक, परभणी, २)साई चौगुले – मुंबई शहर, ३)शुभम बिटके – अहमदनगर ४)अर्जुन दादस – पुणे ग्रामीण, ५)समीर हिरवे – कोल्हापूर, ६)शुभम रेपे – कोल्हापूर, ७) वेदान्त कांबळे – रत्नागिरी, ८)तृणाल भुजबळ – पुणे शहर, ९)जीतसिंग सैनी – ठाणे ग्रामीण, १) रौनक पाटील – ठाणे ग्रामीण, ११)विशाल गोराड – पालघर, १२)वेदान्त उंदरे – अ. नगर, १३)कुणाल हर्णेकर – पालघर, १४)वेदान्त जाधव – परभणी.
प्रशिक्षक :- गिरीश पवार व्यवस्थापक :- नमोशिवाय पायगण.
