मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा उत्सव अधिक व्यापक व्हावा, या उद्देशाने बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबवला. १५ जानेवारी २०२५ रोजी नागरिकांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी विद्यार्थ्यांनी सीएसएमटी येथील महापालिका भवनासमोर प्रेरणादायी गीत सादर करत जनतेला मतदानासाठी प्रोत्साहित केले. (छाया: पी. सुशील)
