शिंदेसेनेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक,  डोंबिवलीत तणाव
कल्याण : डोंबिवली पूर्वेत प्रभाग क्रमांक २९ मध्ये तुकारामनगर, सुनीलनगर भागात शिवसेना (शिंदे) आणि भाजपचे उमेदवार  समोरासमोर उभे ठाकले आहेत. या प्रभागात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण असून  दोन दिवसापूर्वी भाजप उमेदवाराच्या प्रचारकांनी प्रभागात प्रचारपत्रकांसोबत पैसे वाटप केल्याचा आरोप या प्रभागातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील,  यांनी केला होता. ही घटना ताजी असतानाच, पुन्हा याच वादातून  सुनीलनगर भगतवाडी भागात शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नितीन मट्या पाटील, रवी मट्या पाटील आणि इतर आठ जणांनी भाजप महिला उमेदवाराचे पती ओमनाथ नाटेकर (४७) यांच्यावर जीवघेणा  हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भाजपच्या ओमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून शिंदे गटाच्या उमेदवारासह इतर कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करत पाच शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती एसीपी सुहास हेमाडे यांनी दिली आहे. तर शिंदेसेनेचे उमेदवार नितीन पाटील हेही जखमी झाले असून त्यांचावर पोलिसांच्या नजरकैदेत उपचार सुरु असून इतर अरीपोचा शोध पोलीस घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.  या राड्यात भाजपचे २ तर शिवसेनेचे २ पदाधिकारी जखमी झाले आहे. दुसरीकडे शिंदेसेनेच्या उमेदारालासह राड्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनाही अटक करण्याच्या मागणीसाठी आज भाजपच्या वतीने रामनगर पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून अवघ्या दोन दिवसांत मतदान होणार आहे. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातच केडीएमसी निवडणुकीला हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *