महिला लीग क्रिकेट स्पर्धा
धनश्री, आचल, केतकीची फलंदाजीत चमक
मुंबई: दोन शतकी भागीदारींच्या जोरावर भारत क्रिकेट क्लबने ग्लोरियस क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या महिला लीग क्रिकेट स्पर्धेत आपली विजयी आगेकूच कायम राखली. ग्लोरियस संघाच्या २४४ धावांचा पाठलाग करताना धनश्री वाघमारे, आचल वाळुंज आणि केतकी धुरेने दमदार अर्धशतकी खेळी करत संघाला ३ बाद २४५ धावसंख्येसह संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला.
सुरुवातीला इरा जाधव आणि निव्या आंब्रेने नाबाद राहत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. इराने नाबाद १२२ आणि निव्याने नाबाद ७५ धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली. साध्वी संजयने ४२ धावांचे योगदान दिले. या डावातील एकमेव बळी लाजरी भोवरने मिळवला.
प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हानाला सामोरे जाताना भारत क्रिकेट क्लबची सुरुवात खराब झाली. सलामीची जोडी लगेच फुटल्यावर धनश्री आणि आचलने ११२ धावांची भागीदारी करत संघाला विजयाची आस दाखवली. बाद होण्यापूर्वी धनश्रीने ५० धावांची खेळी केली. त्यानंतर आचलने ९९ धावा बनवत केतकीसह १२८ धावांची दुसरी शतकी भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. आचलने ९९ आणि केतकी ६८ धावांवर नाबाद राहिली. या डावात तृषा नारकर आणि आर्या आडकेने प्रत्येकी एक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : ग्लोरियस क्रिकेट क्लब : ४० षटकात १ बाद २४४ ( इरा जाधव नाबाद १२२, निव्या आंब्रे नाबाद ७५, साध्वी संजय ४२, लाजरी भोवर ६-३९-१) पराभूत विरुद्ध भारत क्रिकेट क्लब : ४० षटकात ३ बाद २४५ ( धनश्री वाघमारे ५०, आचल वाळुंज ९९, केतकी धुरे नाबाद ६८, तृषा नारकर ५-१६-१, आर्या आडके ८-२-४३-१).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *