मिरा भाईंदरच्या नागरिकांशी थेट संवाद
मिरा-भाईंदर : निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मिरा भाईंदर शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आले होते. या रॅलीचे नेतृत्व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले, ज्यामुळे रॅलीला विशेष उत्साह लाभला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागरिकांशी संवाद साधताना विकासाभिमुख धोरणे, महापालिकेतील योजनेतील पारदर्शकता आणि जनहिताला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली. नागरिकांनी सरनाईक यांना प्रतिसाद देत “मिरा भाईंदरच्या कारभारात बदल हवा” अशी भावना उघडपणे व्यक्त केली.
