मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकेसाठीची मतदान प्रक्रिया संध्याकाळी साडेपाच वाजत पूर्ण होताच दुरचित्रवाहीन्यांवर एक्झिट पोलचा धमाका सुरु झाला. जवळपास सर्वच एक्झिट पोलने मुंबईतून उद्धव ठाकेरंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक्झिट दाखवली असून मुंबईत पहिल्यांदा भाजपाचा महापौर बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला गड राखल्याचे चित्र आहे. दरम्यान संजय राऊत यांनी ठाकरे बंधू १२० जागा जिंकतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडलं. त्याचा निकाल उद्या १६ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्या आधी या निकालाचा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल समोर आले आहेत.
मुंबई महापालिकेसाठी जनमतचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार भाजप आणि शिंदे यांच्या युतीला१३८ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त ६२ जागा मिळतील असं म्हटलंय.
दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित आघाडीला २० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी इतर पक्षांना ७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जेव्हीसी एक्झिट पोलनुसार, मुंबईत भाजपची सत्ता येणार असून सर्वाधिक मतदान टक्काही त्या पक्षाला मिळणार आहे. या अंदाजानुसार भाजप शिंदे – १३८ ठाकरे- मनसे – ५९. काँग्रेस-वंचित – २३ आणि इतर – ७ जागा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्याचवेळी लोकशाही आणि रुद्र रिसर्च यांच्याही एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला १२१ जागा मिळतील. तर ठाकरेंच्या युतीला ७१ जागा मिळतील. काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला मुंबईत २५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर १० जागा पटकावतील.
रुद्र रिसर्च
भाजप + शिंदे – १२१
ठाकरे +- मनसे – ७१
काँग्रेस + वंचित – २५
इतर – १०
अॅक्सिस माय इंडिया मुंबई एक्झिट पोल
भाजप + शिंदे – १३१-१५१
ठाकरे + मनसे – ५८-६८
काँग्रेस + वंचित – १२-१६
इतर – ६-१२
जेडीएस मुंबई एक्झिट पोल
भाजप + शिंदे – १२७-१५४
ठाकरे + मनसे – ४४-६४
काँग्रेस + वंचित – १६-२५
इतर – ०९-१७
