स्वाती घोसाळकर

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर दुरागामी परिणाम करणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का घसरलाय. निवडणूकी आयोगाकडून दुपारी साडेतीन वाजता जाहिर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फक्त ४१.०८ टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत होती. त्यामुळे पुढील दोन तासात हा आकडा ४६ ते ५० टक्क्यार्यंत पोहचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशीरा किंवा उद्या सकाळी मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी जाहिर केली जाईल. २०१७ साली तब्बल ५५.२८ टक्के मतदान झाले होते. त्या निवडणूकीत पहिल्यांदाच भाजप, एकत्रित शिवसेना, क्राँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूका लढल्या होत्या.

दरम्यान, राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी  आज दिवसभर उत्साहात मतदान झाले. मुंबईत सकाळी  असणारा मतदानाचा उत्साह दुपारनंतर मावळल्याचे पहायला मिळाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान झाले असून मुंबईतील कुलाबा येथील वॉर्ड २२७ मध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत फक्त १५.७३ टक्के मतदान झाले आहे. कदाचित हा राज्यातील सर्वात कमी मतदान झालेला वॉर्ड असू शकेल.

राज्यात ९ वर्षानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदानासाठीही यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येतं आहे. सोलापूर महापालिकेतही मतदान टक्का घसरणार असल्याचे दिसून येते, ५२ ते ५५% मतदानाचा अंदाज व्यक्त होत आहे. सोलापुरात साडेतीन वाजेपर्यंत ४०.३९ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील २९ महापालिकांमध्ये

साडे तीन वाजेपर्यंतचे मतदान

मुंबई : ४१.०८ टक्के

ठाणे : ४३.९६ टक्के

कल्याण डोंबिवली : ३८.६९ टक्के

नवी मुंबई– ४५.५१ टक्के

उल्हासनगर : ३४.८८ टक्के

भिवंडी निझामपूर – ३८.२१ टक्के

मिरा भाईंदर : ३८.३४ टक्के

वसई विरार : ४५.७५ टक्के

पनवेल : ४४.०४ टक्के

नाशिक : ३९.६४ टक्के

पुणे – ३६.९५ टक्के

पिंपरी चिंचवड – ४०.५० टक्के

छ. संभाजीनगर : ४३.६७ टक्के

नागपूर : ४१.२३ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *