नवी मुंबईत मनसेचे
परप्रांतियाला खळखट्ट्याक
नवी मुंबई : नवी मुंबईत महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळखट्ट्याक करीत त्याला चांगलाच दिला चोप दिला आहे. कोपरखैरणे इथं ही घटना घडली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला चांगलचा चोप दिला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परप्रांतीय व्यक्तीने राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.
