भिवंडी : भिवंडीत भाजपा पक्षात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. भिवंडीतील प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांनी भाजपा आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले याचा पराभव केल्या नंतर मागील दोन दिवसांपासून तंग असलेल्या वातावरणात मित चौघुले यांचे समर्थकांनी कोणार्क विकास आघाडी चे माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर प्राणघातक हल्ला करीत दगडफेक केली. यावेळी काही कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला केला गेला.त्यानंतर विलास पाटील समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर बसून आंदोलन करीत होते.त्याच वेळी समोर असलेल्या आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयात मोठा जमाव जमला होता.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार महेश चौघुले यांचे कार्यालयातून दगडफेक,सोडा वॉटर बॉटल व बल्ब यांचा मारा करण्यात आला. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी परिसरात तैनात करण्यात आला.या वेळी विलास पाटील यांनी आमदार महेश चौघुले व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.निजामपूर पोलिसांनी सुरवातीपासून भाजपाच्या बाजूने काम करीत आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध करीत भाजपा मुख्यमंत्री त्याला पाठीशी घालीत असल्याचा आरोप विलास पाटील यांनी केला आहे.दरम्यान या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून दगडफेकीमध्ये माजी महापौर प्रतिभा पाटील या सुद्धा जखमींखल्या आहेत.
