सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे विनामूल्य आरोग्य शिबीर संपन्न
ठाणे, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी ठाणे व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वावे येथे विनामूल्य आरोग्य शिबीर संपन्न झाले.
रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी ठाणे व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ सुवर्ण महोत्सवी वर्ष संकल्पना अंतर्गत सुधागड तालुक्यातील वावे गाव येथील हनुमान मंदिर विनामूल्य आरोग्य शिबिर रविवारी संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात ठाण्यातील नामवंत डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधेही दिली. दिवसभरात पार पडलेल्या शिबिरात वावे, रासळ, चिवे, जांभूळपाडा पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी ठाणे अध्यक्ष सुरेश कल्याणकर, सचिव जितेंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत डॉ. श्रीपाद बोडस, फिजिशियन डॉ. नीता पाटील, एनटी सर्जन डॉ. कौशिक पेढामकर, डॉ. सिंग, डॉ. आकांक्षा यांनी रुग्णांची तपासणी केली. सिनिअर नर्स प्रिया शिंदे यांनी रुग्णाची मधुमेह तपासणी व रक्तदाब तपासणी केली तसेच संग्राम जोशी यांनी रुग्णांना लाखो रुपयांची औषधे मोफत पुरविली. तसेच रोटरी क्लब चे मोहन तेलंग, उदय पाटील, वैभव नारकर यांनी सहकार्य केले या शिबिरासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, उपाध्यक्ष शंकर काळभोर, उपाध्यक्ष वसंत लहाने, खजिनदार विजय पवार, चिटणीस अविकांत साळुंके, ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल खेरटकर, संस्थेचे समन्वयक बळीराम निंबाळकर सर, शिक्षण समितीप्रमुख अनिल सागळे, आरोग्य समिती प्रमुख राजेश बामणे, सल्लागार शिवाजी दळवी, प्रसिद्धी प्रमुख अजय जाधव, कार्यकारी सदस्य अनिल सागळे, भगवान तेलंगे, अनिल चव्हाण, प्रवीण बामणे आणि वावे ग्रामस्थ मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली.
