हळदी समारंभातील जेवण केल्याने ३० ते ४० लोकांना विषबाधा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीतील बाविस्कर कुटुंबात शनिवारी रात्री हळदी समारंभा निमित्ताने जेवण जेवल्यानंतर ३०ते ४० जणांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने उपचारार्थ रूग्णालयात नेण्याचा बाका प्रसंग ओढावला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीमधील बाविस्कर कुटुंबात मुलीचा हळदी समारंभ शनिवारी होता. या समारंभा निमित्ताने रात्री आलेल्या पाहुणे आणि कुटुंबायांनी जेवण केल्यानंतर काही तासांनी उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने उपचारार्थ रूग्णालयात नेण्याचा प्रसंग ओढावला. या जेवणातील विषबाधेचा जास्त त्रास जेष्ठांना, बालकांना झाल्याचे समजते. यामध्ये ज्या मुलीची हळद होती ती, तिची आई, बहीण यांना देखील त्रास झाला. या धक्कादायक प्रकारामुळे रविवारी होणारा लग्न समारंभ कार्यक्रम रद्द करावा लागल्याचे कुटुंबियांच्या वतीने प्रसिध्दी माध्यामांना सांगितले. तसेच या घटना प्रकरणी जेवणाच्या कंत्राटदारावर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत गुन्हा दाखल करून कारवाई ची मागणी केली असल्याचे समजते.
