मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे २२ जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल.
राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या अध्यक्षतेखाली २२ जानेवारीला, परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ११ वा. पासून आयोजित करण्यात आली आहे. तरी, सदर बाब राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती, असं नगरविकास विभागाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
