ऍड. रेश्मा भोपी यांच्या कार्यालयाचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते उद्घाटन
कल्याण: ऍड. रेश्मा गुरुनाथ भोपी यांच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. कल्याण कोर्टा शेजारील कमर्शिअल सेंटरमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते फित कापून या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या दरम्यान आमदार राजेश मोरे यांचं भोपी दांपत्या कडून स्वागत करण्यात आले. तर आमदार मोरे यांनीही ऍड. रेश्मा भोपी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ऍड. रेश्मा भोपी या कल्याण जिल्हा फौजदारी न्यायालय वकील संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्ष पदाच्या उमेदवार असून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहनही आमदार राजेश मोरे यांनी केले आहे. याबाबत ऍड. रेश्मा भोपी यांनी आमदार राजेश मोरेंचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे वकील संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्ष पदावर निवडून देण्यासाठीही त्यांनी आवाहन केले आहे. अध्यक्ष पदावर निवडून दिल्यास वकिलांच्या न्याय हक्कासाठी लढणार व आवाज उठवणार असे यावेळी ऍड.रेश्मा भोपी म्हणाल्या. ऍड.रेश्मा भोपी यांच्या नव्या कार्यालयाच्या उदघाटनास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने वकील सहकाऱ्यांनी उपस्थित राहून भोपी यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उपस्थित महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचेही आयोजन ऍड.रेश्मा भोपी यांनी केले होते.
