नोबल प्रीमियर लीग २३ जानेवारीला रंगणार
ठाणे: मुंबईसह गुजरात, हिमाचल प्रदेश आणि पद्दुचेरी येथील बारा संघाचा समावेश असलेल्या नोबल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार शुक्रवार,२३ जानेवारी रोजी रंगणार आहे. रबाळे येथील गोठवली गाव मैदानासह ठाणे, नवी मुंबईतील विविध मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन नोबल प्रिंटिंग प्रेस तर्फे करण्यात आले असल्याची माहिती स्पर्धेचे प्रमुख संयोजक विजय चमारिया यांनी दिली. मागील काही वर्षांपासून होत असलेल्या या स्पर्धेतील विजेत्या संघाला विजयी चषक, रोख ११,००१ रुपये आणि प्रत्येक खेळाडूला पदक देऊन गौरवण्यात येईल. तर उपविजेत्या संघाला ५,००१रुपयांच्या रोख बक्षिसासह गौरवचिन्ह,प्रत्येक खेळाडूला पदक देऊन सन्मानित करणार असल्याचे स्पर्धेचे सहसंयोजक पराग चमरिया यांनी सांगितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशाल टोडी , वैभव टोडी यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे सदस्य मेहनत घेत आहेत.
