शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे

हॉटेलमधून चेकआऊट

 ४ दिवसांनी घरी परतले ० हॉटेल पॉलिटिक्स संपले ० दिल्ली पॉलिटिक्स सुरु

स्वाती घोसाळकर

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील २९ नगरसेवकांचा हॉटेलमधिल मुक्काम आज मंगळवारी अखेर संपला. या २९ नगरसेवकांनी आज चेकआऊट करीत आपापले घर गाठले.

मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागताच शिवसेना शिंदे गटाने निवडून आलेल्या २९ नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलममध्ये ठेवले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी भाजपवार दबाव आणण्याकरीता हे हॉटेल पॉलिटिक्स शिंदेंकडून खेळले गेल्याचा आरोप भाजपातील नेते खाजगीत करीत आहेत. तर शिंदेंना नगसेवक फोडले जाण्याची भीती असल्यामुळेच त्यांनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप संजय राऊतांनी केल्यामुले देशभरात या घटनेची चर्चा झाली होती. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या या हॉटेल पॉलिटिक्सवरही भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने १३५ जागा लढून ८९ जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांनी ९० जागा लढून केवळ २९ जागा जिंकल्याने युतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे. शिंदेंनी जास्त जागा लढवल्यामुळेच महायुतीचे नुकसान झाल्याची तक्रार भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी शिर्ष नेतृत्वाकडे केल्याचे सुत्रांनी सांगितले.

89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष

89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलातर त्यापाठोपाठ  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्याततर शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्याराज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळाल्यामुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचा स्ट्राईक रेट राहिलाभाजपनंतर शिवसेना ठाकरे गटाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहेतर सर्वात कमी स्ट्राईक रेट राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा राहिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *