ठाकरेंची मुंबई नगरसेविका
डॉ. म्हस्के नॉट रिचेबल
मुंबई : निवडणूकीच्या आधी उमेदवार पळपवापळवी नंतर आता थेट निवडूण आलेले नगरसेवकच पळवण्याच प्रकार मुंबईतही सुरु झाल्याची चर्चा आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची नगसरेविका डॉ सरिता म्हस्के या नॉटरिचेबल आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेतून चांदिवलीच्या प्रभाग क्रमांक १५७ मधून डॉ.सरिता म्हस्के निव़डून आल्या आहेत. पण आज मुंबईतील नगरसेविकांची गटनोंदणी करताना त्या गैरहजर राहील्याने त्यांच्या फुटीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
डॉ.सरिता रवींद्र म्हस्के यांना शिवसेना उबाठा पक्षाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरपालिकेची उमेदवारी दिली होती. उमेदवारीसाठीची आपला एबी फॉर्म त्यांनी मातोश्रीवर जाऊन घेतला.
डॉ.सरिता रवींद्र म्हस्के यांचे पती रविंद्र म्हस्के हे चांदिवलीमधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तर, २०१७ मध्ये डॉ. सरिता म्हस्के यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली होती, त्यावेळेस अवघ्या ४०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी, येथून ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा आकांक्षा शेट्टे निवडून आल्या होत्या. त्यांनतर म्हस्के यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, २०२५ साली भाजपमधून शिंदेंच्या शिवसेना पक्षात म्हस्के यांनी प्रवेश केला. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात भाजपने ही जागा स्वत:कडे ठेवली, तसेच पुन्हा ठाकरेंच्या आकांक्षा शेट्टे यांना उमेदवारी दिल्याने म्हस्केंनी शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडली. तसेच, शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करीत मातोश्रीवर जाऊन नगरसेवक पदाची उमेदवारी घेतली. शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावर त्या विजयी झाला, त्यांनी भाजपच्या आकांक्षा शेट्टे यांचा पराभव केला. मात्र, आता नगरसेविका बनल्यानंतर त्या नॉट रिचेबल झाल्या आहेत.
नगरसेविका सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत, त्या कुठेही गेलेल्या नाहीत. त्यांनी त्यांचे कौटुंबिक कारण सांगितले आहे. पुढील १ महिन्यापर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यासाठी कायदेशीर वेळ आहे. त्यामुळे, डॅा. सरिता म्हस्के यांची नोंदणी होईल. म्हस्के यांनी दिलेले कारण आम्ही कोकण विभागीय आयुक्तांना सांगितले आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. पुढील १ महिना त्या न आल्यास काय कारवाई करायची याबाबत पक्षश्रेष्ठीच ठरवतील, पण ती वेळ येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
