नवी दिल्ली : आतंरराष्ट्रीय अवकाश केंद्राला भेट देणाऱ्या भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी भारत सरकारकडून अशोक चक्र जाहीर करण्यात आलं आहे. शांतता काळातील हा सर्वोच्च सैन्य सन्मान पुरस्कार आहे.

शुभांशू शुक्ला यांनी २६ जून २०२५ ला नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून स्पेसएक्स या ड्रॅगन स्पेसक्राफ्ट मधून  आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात पोहोचत इतिहास घडविला होता. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्रात पाऊल ठेवणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. तर, राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात पोहोचणारे दुसरे भारतीय आहेत. राकेश शर्मा ४१ वर्षापूर्वी अंतराळात गेले होते. शुभांशू शुक्ला यांच्याशिवाय गगनयान मिशनसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांपैकी ग्रुप कॅप्टन पीबी नायर यांना कीर्ती चक्र जहीर झालं आहे.

One attachment  •  Scanned by Gmail

Add to Drive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *