ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलातील ७५ हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले असून त्यात ठाण्याच्या सुवर्णा शिंदें यांनाही राष्ट्रपती पुरस्कार जाहिर झाला आहे. सुवर्णा शिंदे यां महाराष्ट्र राज्याच्या एटीएस दलातील पहिल्या महिला अधिकारी आहेत. अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांनी महत्वपुर्ण भुमिका बजवली आहे. आज महाराष्ट्राला जाहिर झालेल्या पुरस्कारात ३१ शौर्य पदके, ४ उत्कृष्ट सेवा पदके तसेच ४० गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदकांचा समावेश आहे.

राज्य पोलिस दलातील या सन्मानित अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलिस महासंचालकांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावल्याची भावना व्यक्त केली.

यंदा उल्लेखनीय सेवेसाठी चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहेत. त्यात पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश उदाजी पाटील, दक्षिण विभागाचे पोलिस दलप्रमुख व माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलिस उपायुक्त बालकृष्ण मोतीराम यादव, पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल खंडुजी कुबडे, मुंबई वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सायर्स बमन इराणी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *