धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण 

रघूवीर खेडकरअशोक खाडेरोहित शर्माला पद्मश्री,

मुंबई : आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीवर राज करणाऱ्या धर्मेंद्र यांना मरणोत्तर भारतातील मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून यंदाच्या २०२६ सालचे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

देशातील दुसऱ्या क्रमाकांच्या सर्वोच्च अशा पद्मविभुषण पुरस्कारासाठी देशभरातून धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांची निवड केली, तर  १३ जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. यात महाराष्ट्रातील

अल्का याज्ञिक, पियुष पांडे , महेंद्र कोटक ( तिघांनाही पद्मभुषण) तर रघूवीर खेडकरअशोक खाडेरोहित शर्मा ( पद्म पुरस्कार ) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राचे पुरस्कार प्राप्त दिग्गज :

पद्मविभूषण : धर्मेंद्रसिंह देओल (मरणोत्तर) : कला

पद्मभूषण : अलका याग्निक : कला, पीयूष पांडे (मरणोत्तर) : कला,
उदय कोटक : व्यापार आणि उद्योग

पद्मश्री : श्रीरंग देवबा लाड : कृषी , रोहित शर्मा : क्रीडा, सत्यनारायण नुवाल : व्यापार आणि उद्योग, रघूवीर खेडकर : कला, माधवन रंगनाथन : कला, जुझेर वासी : विज्ञान आणि अभियांत्रिकी,जनार्दन बापुराव बोथे : समाजकार्य, भिकल्या लाडक्या धिंडा :कला, अशोक खाडे : व्यापार आणि उद्योग , अर्मिडा फर्नांडिंस : वैद्यकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *