कलाश्रमचा अमृत महोत्सवी ‘अभियान सन्मान’ सोहळा
अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने सहदेव सदैव कराओके अभिनव स्पर्धा
कलाश्रमच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात  सव्वाशे कलाकार एकत्र येणार
मुंबई –‘कलाश्रम’ ही स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला अभियान सन्मान हा उपक्रम राबवला जातो. गेल्या आठ वर्षात यानिमित्ताने समाज हिताचे आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देणारे अभिनव स्पर्धेचे आयोजन करणे सुद्धा वाढलेले आहे. आजवर कलाश्रमने ६६ स्पर्धा या विनामूल्य स्पर्धा घेतल्या आहेत. त्याचे वशिष्ठ म्हणजे जे एकदा बक्षीस पात्र झालेले आहेत. त्यांना वर्षभर या स्पर्धेत भाग घेता येत नाही. अन्य स्पर्धकांना संधी मिळावी हा त्या पाठीमागचा हेतू आहे. ‘अभियान सन्मान’च्या अमृत महोत्सवी उपक्रमाच्या निमित्ताने गायक कलाकारांसाठी ‘सहदेव सदैव कराओके स्पर्धा’ आयोजित केलेली आहे. कलाश्रमची ही ६८ वी स्पर्धा असणार आहे. सामाजिक कार्यकर्ते, कलासंपन्न मनाचे भाऊ नाटळकर यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा होणार आहे. प्राथमिक फेरीमध्ये यशस्वी ठरणाऱ्या वीस स्पर्धकांना सोमवार ३० मार्च  दुपारी ३.३० वाजता पु. ल. देशपांडे रवींद्र नाट्य मंदिर इथल्या लघु नाट्यगृहात  प्रत्यक्ष रंगमंचावर कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. याचवेळी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ कोण यांची घोषणा केली जाणार आहे. प्रशस्तीपत्रक, भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. नाव नोंदणीची तारीख ही ४ फेब्रुवारी आहे. नोंदणी करणाऱ्या स्पर्धकालाच यात प्रवेश दिला जाईल. ‌स्पर्धा समन्वयक म्हणून मृण्मयी मोडक काम पाहणार आहेत. संपर्क – ९८६९००८८०५ नंदकुमार परशुराम पाटील हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत तर नंदिनी नंदकुमार पाटील या संचालिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *