गुणवंत विद्यार्थ्यांना नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानित
मुकुंद रांजणे
माथेरान : माथेरान मधील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कौशल्याबाबत शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडत असतात. याकामी केंद्रप्रमुख शिक्षक नारायण सोनावणे आणि पत्रकार मुकुंद रांजणे यांच्या संकल्पनेतून यावेळी पहिल्यांदाच तिन्ही शाळेतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून प्रमाणपत्र दिल्यास अन्य विद्यार्थी सुध्दा शैक्षणिक क्षेत्रात,त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात आपल्यातील कलागुणांना वाव मिळवून देऊ शकतात ज्यामुळे शाळेच्या नावासह गावाचे नावलौकिक सुध्दा वाढू शकते यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळा, गव्हाणकर एज्युकेशन शाळा आणि सेंट झेव्हियर स्कुल मधील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनिंना विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी,मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि उप नगराध्यक्ष संतोष शेलार यांच्या शुभहस्ते प्राथमिक शाळेच्या प्रांगणात प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळेचे सई उमेश लोखंडे इयत्ता ५ वी, विरेन पांडुरंग झोरे-इयत्ता ७ वी, सेंट झेव्हीअर्स हायस्कुलचे उमेर अनिस शेख- इयत्ता आठवी व रिचा राजेश दळवी इयत्ता दहावी तसेच प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर, या शाळेतील गुणवंत विद्यार्थी कु. सानिया सुखदेव पारधी इयत्ता – १ 0 वी, प्रेम गोविंद दाभाडे इयत्ता १ 0 वी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी,गव्हाणकर शाळेचे मुख्याध्यापक रमेश ढोले, संघपाल वाठोरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे, संतोष चाटसे तसेच अन्य शिक्षक वृंद आणि पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
