ते सर्वार्थाने ‘दादा’ होते– उद्धव ठाकरे

मुंबई : “एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला! मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. ते खऱ्या सर्वाताने महाराष्ट्राचे दादा होते अशा शब्दात अजित पवार यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

“एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *