दिलदार मित्र गमावला- फडणवीस

मुंबई – जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

माझा दमदार आणि दिलदार मित्र गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य चार जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *