प्रजासत्ताक दिनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव
नवी मुंबई : (अशोक गायकवाड )–भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ७७ वा वर्धापन दिनाचा कोकण विभाग स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-१७, कळंबोली येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आणि शालेय विद्यार्थी आदींना विभागीय आयुक्तांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परेड कमांडर श्रीमती प्रेरणा कट्टे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाने राखीव पोलीस मुख्यालय नवी मुंबई, एस.आर.पी.एफ,ग्रुप नं.११ प्लाटून, क्यु .आर.टी.पथक, नवी मुंबई, आर.सी.पी.पथक, नवी मुंबई, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई वाहतूक पोलीस पथक, डॉग स्कॉड बॉम्ब शोधक/नाशक पथक, बँड पथक, वरुन वाहन, वज्रवाहन, निर्भया पथक इरटिगा, फायर बुलेट, निर्भया पथक ॲक्टीव्हा, अग्निशामक रेस्क्यु व्हॅन सिडको आदीनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेले पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांना विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागतर्फे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.३६ कोपरखैरणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.११२ करावे गांव, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१५ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.९३ सीवुड, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१०२ नेरुळ, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१०१ शिरवणे या सहा शाळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमास अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग सिध्दाराम सालीमठ, सहआयुक्त (नियोजन) प्रमोद केंभावी, उपर आयुक्त (विकास) डॉ.माणिक दिवे, सहआयुक्त (पुर्नवसन) रवि पाटील, सहआयुक्त (करमणूक व शुल्क) रविंद्र पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचलन केल्याबद्दल शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांना विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *