टिटवाळा मंदीर परीसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करण्याची मागणी
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
कल्याण : टिटवाळा मंदिर परिसरातील नागरी, व्यवसायिक सुरक्षा व वाहतूक कोंडीच्या निवारणाकरिता कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापित करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा शहरमार्फत करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस उपधीक्षक व कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. अपर पोलीस अधीक्षक यांच्याशी याबाबत चर्चा केली असता निवेदनानुसार तजवीज करणार असल्याचे आश्वासन महासंघाला देण्यात आले आहे.
कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिटवाळा हे गाव महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषीत केलेले असून, टिटवाळा हे महागणपतीचे प्रसिध्द तिर्थस्थान आहे. तेथे नियमीतपणे व विशेषतः मंगळवार, चतुर्थी व अंगारीका हया दिवशी हजारोंच्या संख्येने भावीक येत असतात व अनेकवेळा वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे याठिकाणी कायमस्व्यरूपी पोलीस चौकी असणे गरजेचे आहे.
टिटवाळा येथील महागणपती मंदिर परिसरातून मौजे गुरवली, रूंदा-फळेगाव व गोवेली या गावांकडे रस्ता जात असून या परीसरात अनेक गृहसंकुले असून, व्यावसायिक संकुले आहेत. हा परीसर नियमीतपणे वाहतुकीचा व वर्दळीचा असल्याने बाहेरूनही अनेकवेळा मालवाहतुक होत असते. तसेच अनेक गृहसंकुलनाकडे जाणा-या रस्त्यांवर आंधार पडल्यावर संशयीत फिरस्ते फिरत असतात. अनेक मद्यपी जागोजागी मद्यपान करतांना आढळून येतात त्यामुळे अंधार पडल्यावर या रहीवासी संकुलनातील महीला, वृध्द हयांना या रस्त्यावरून जाणे येणे भितीदायक होत असल्याच्या तकारी प्राप्त होत आहेत. तसेच वेळप्रसंगी चेनस्नॅचिंग, चोरी, घरपोडी व शरीराद्विरुध्दचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हि परीस्थिती पहाता टिटवाळा येथील मंदीर परिसरात कल्याण तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करून त्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नेमणुक होऊन कायमस्वरूपी विशेषतः रात्रीच्या वेळची गस्त घालणे सोयीस्कर होणार असून होणा-या गुन्हयांना आळा बसणार आहे. तरी कल्याण तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत टिटवाळा मंदीर परिसरात सोयीस्कर ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन होऊन त्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करण्यात येऊन त्यांना रस्त्यांवर, गृहसंकुलनामध्ये रात्रीची गस्त घालण्याचे आदेश देण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा शहरतर्फे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *