दीड महिन्याच्यावर आझाद मैदानात उपोषण आंदोलनानंतर नोवेल साळवे यांच्यावरील हल्लेखोरावर गुन्हा दाखल
कल्याण : कल्याण मधील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्यावर उल्हासनगर येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात साळवे गंभीर जखमी होऊन त्यांना कार्डियक अटॅक आला होता. याप्रकरणी एक वर्षाहून जास्त कालवधी उलटून देखील गुन्हा दाखल केला नव्हता. या प्रकरणी साळवे यांनी दीड महिन्याच्यावर आझाद मैदानात उपोषण आंदोलन केल्यानंतर अखेर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.
९ जून २०२५ रोजी उल्हासनगर येथे एका वृद्ध सिंधी व्यक्तीला काही लोक मिळून मारत होते. सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेले असताना त्यामधील एका अज्ञात व्यक्तीकडून साळवे यांच्या वर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात साळवे यांचा ब्लडप्रेशर स्ट्रोक झाला व त्यांना कार्डियक अटॅक आला होता. त्यानंतर साळवे यांची ओपन हार्ट सर्जरी करण्यात येऊन २४ दिवस दवाखान्यात उपचार घेत होते. या घटनेची माझ्या कुटुंबियांनी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या पोलिसांना माहिती देऊन सुद्धा त्यांनी त्यावेळेस कुठलीच ठोस कार्यवाही केली नाही. त्यावर आश्चर्याची गोष्ट अशी की पोलिसांनी साळवे यांचा जवाब न नोंदविता माझा केस दफ्तरी फाईल करून टाकले होते.
झालेल्या ह्या अन्याय विरोधात राज्य सरकार कडून पाऊले उचलण्यासाठी साळवे यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांना निवेदन दिले होते, परंतु त्या निवेदनांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याकारणाने साळवे ८ डिसेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषण आंदोलन करत होते. त्यांच्या या आंदोलनाला दीड महिन्याच्या वर वेळ झाल्यानंतर थोडा न्याय मिळाला आहे, उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस स्टेशन च्या पोलिस अधिकारयांनी मंगळवारी दोषींवर गुन्हा दाखल केला आहे.
