दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान
कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने पकडून जीवदान दिल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात गुरुवारी दुपारी साडेपाच फुटी लांब कोब्रा नागाची आणि मुंगूस यांची झुंज रंगली होती.
दरम्यान तिथे किल्ले दुरुस्ती काम करणारे कामगार पोहचले त्यांची चाहूल लागल्याने मंगूस पळून गेले. त्या नागाचा रूद्र अवतार पाहता मंजुराची भितीने त्रेधातिरपीट उडाली. प्रसंगावधान पाहत सुरक्षा कर्मचारी मोरे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने घटनास्थळी पोहचत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी साडेपाच फुटी लांब विषारी कोब्रा नागास पकडून जीवदान दिल्याचे पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले की, गारव्यामुळे साप उन्हाची तिरिपसाठी दगडी पायरी परिसरात उबीसाठी आला असावा. संदर्भीत पकडलेल्या विषारी नागास जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना पाहता भक्तांनी देखील मंदिर परिसरात जाता येताना लक्ष देत मार्गाक्रमण गरजेचे आहे.
