जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले!
राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने एक धैर्यशील,प्रगती आणि जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले, महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे,अशा भावपूर्ण शब्दात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी काल दुर्दैवी विमान अपघातात निधन पावलेले महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज शो व्यक्त ठरावाद्वारे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.रा.मि.म.संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहिर यानी बारामतीला जाऊन स्व.अजितददाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *