पंतप्रधान मोदींचा रोडमॅप

नवी दिल्ली : देशाची आर्थिक दिशा ठरवणारे संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात झाली असून रिफार्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’वर फोकस हा आपला रोडमॅम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आहे.

 या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके, मोठे आर्थिक निर्णय अपेक्षित आहेत. १ फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि आज संसदेत मांडला जाणारा आर्थिक सर्वेक्षण २०२६-२७ यामुळे हे अधिवेशन अधिकच महत्त्वाचे ठरले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी, पंतप्रधान मोदी म्हणाले की, २१व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प या शतकाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला अर्थसंकल्प असून, तो देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल, असे मतही त्यांनी मांडले.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार असून, हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासातील गौरवशाली क्षण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *