लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थतर्फे
विशेष मुलांसाठी उडान ११ चे आयोजन
ठाणे : लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि त्यांची युथ विंग लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उडान नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार,१ फेब्रुवारी रोजी एन. के. टी सभागृहात होणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष प्रसाद खोपकर यांनी दिली.
यासंदर्भात प्रसाद खोपकर म्हणाले, दिव्यांग (विशेष)मुलांना कला कौशल्याला संधी मिळावी म्हणून लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उडान ११ हे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. यावर्षी १३ विशेष शाळांमधील सुमारे १३० पेक्षा जास्त विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. विजेत्या शाळांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. तर, उडान ११ च्या माध्यमातून केवळ कलेचे सादरीकरण होणार नसून, त्यांना समज आणि स्वीकारण्याची भावना प्रबळ करण्याचा प्रयत्न आहे. विशेष मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन लिओ क्लबच्या अध्यक्षा ग्रीष्मा इंदप यांनी केले आहे.
