श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याणतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप
कल्याण :   कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टतर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजूं या योजनेचा लाभ घेत असतात. महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं. त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते. आधारवाडीच्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात.
सोमवारी झालेल्या या उपक्राला दाता म्हणून अरविंद कपोते, दिपक पोपट व जतिन ठक्कर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात विषेश अतिथी म्हणून नगरसेवक जतिन प्रजापति व मेधा खेमा उपस्थित राहिल्या होत्या. संस्थेचे संचालक  जसू चंदाराणा व छबिल कारीया यांनी संस्थे तर्फे त्यांच्या सत्कार केला. ज्या कोणाला या अन्नक्षेत्राच्या सेवाकार्या मध्ये सहयोग द्यायचा असेल त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *