विधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं
बाबासाहेबांनी सर्व घटकांना समान न्याय व हक्क देणारे संविधान दिले   – आनंद गायकवाड
कल्याण: पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालय सेंट वाय सी इंग्लिश स्कूल सम्राट अशोक इंग्लिश स्कूल आणि विपश्यना बालविहार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानात लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पाहता संस्थेने प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांच्याहस्ते तिरंगी ध्वजारोहण केले.
आनंद गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून सतत्याहत्तर वर्षे झाली. शेवटच्या घटकापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा अद्यापही मिळत नाहीत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सर्व घटकांना समान न्याय व  हक्क देणारे संविधान दिले  परंतु आजही देशात गरिबी आणि दारिद्र्य आहे. बिनविरोध निवडणूक करून नागरिकांचा मतांचा अधिकारच काढून घेत आहेत हे लोकशाहीला घातक आहे. संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पत्रकारितेच्या माध्यमातून घडलेल्या घटना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात माझ्या हस्ते ध्वजारोहण करून माझा सन्मान केला मी धन्य झालो.
शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या चालीवर आकर्षक कवायतीच्या माध्यमातून देशभावना जागृत केल्या.आर. एस. पी. आणि एम. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी संचलन करत तिरंगी झेंड्यास सलामी दिली. महापुरुषांच्या वेशभूषेवर आलेली लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय माध्य. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथ. विभाग मुख्याध्यापिका सुजाता नलावडे तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *