दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली
ठाणे :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना जिल्हाधिकारी डॉ. कृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांच्या वतीने यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारीप डॉ.संदिप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के-पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, उमेश पाटील, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आनंद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करण्यात येवून त्यांना हे दु:ख सहन करण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील  मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *