गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी २०० मुलींना मोफत लसीकरण
ठाणे: न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ठाणे शतक महोत्सवानिमित्त सखी सावित्री समितीतर्फे, इनर व्हील क्लब्स – झोन ५ यांनी आदित्य बिर्ला ग्रुप आणि रोटरी क्लब ऑफ मुलुंड यांच्या सहकार्याने २०० मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) संरक्षणासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute of India) सर्वावॅक एचपीव्ही (Cervavac HPV) लस यशस्वीरित्या दिली आहे. या लसीचे दोन डोस मुलींना मोफत देण्यात आले.
पहिला डोस २१ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात आला, तर दुसरा डोस २८ जानेवारी २०२६ रोजी देण्यात आला. हे संपूर्ण लसीकरण वैद्यकीय देखरेखीखाली आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या सहाव्या मजल्यावरील भोळे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इनर व्हील स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी या उपक्रमाला मोठे सहकार्य केले.
हा उपक्रम मुलींच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. या उपक्रमामुळे अनेक गरीब आणि गरजू मुलींना मोफत लसीचा लाभ मिळाला आहे.
