पनवेल-गव्हाण भागात भाजप महायुती उमेदवारांना जनसमर्थन
पनवेल: रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान सर्व स्तरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या भरघोस विजयाचा आत्मविश्वास अधिक बळकट केला आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार जोमाने प्रचार करत असून विजयासाठी सज्ज झाले आहेत. अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे.स्वर्गीय जनार्दन भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या गव्हाण विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम या नेतृत्वाने गेल्या अनेक वर्षांत केले आहे. नागरिकांचे प्रश्न सातत्याने सोडविणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि कोणत्याही भेदभावाविना मदतीचा हात देणे ही या नेतृत्वाची ओळख आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कायम लोकाभिमुख कार्यपद्धती अवलंबली आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव राहिला असून यामुळेच त्यांना नेहमीच जनतेचा भरघोस पाठिंबा लाभला आहे. या विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा लाभ भाजप महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत निश्चितच होणार असून गव्हाण जिल्हा परिषदमध्ये निकिता खारकर, तसेच वहाळ पंचायत समितीमधून वितेश म्हात्रे व गव्हाण पंचायत समितीगणामध्ये जिज्ञासा कोळी या तीनही उमेदवारांचा अर्थात भाजप महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
