सीटीसीच्या शताब्दी समिटला मुंबईत प्रारंभ
रमेश औताडे
मुंबई : चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स या अग्रगण्य व्यावसायिक संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘द शताब्दी समिट सेंटेनरी कॉन्फरन्स’ या दोन दिवसाच्या भव्य परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. परिषदेचे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते इंडसइंड बँकेचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन डिझिग्नेट अरिजित बसू यांनी  भारताच्या आर्थिक प्रवासात लवचिक वित्तव्यवस्था व जबाबदार विकास या विषयावर बोलताना त्यांनी नैतिकता, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि व्यावसायिकांच्या जबाबदारीवर भर दिला.
बदलत्या आर्थिक व व्यावसायिक वातावरणात कर, कायदा व लेखा क्षेत्रातील तज्ज्ञांनी तंत्रज्ञान, प्रशासन आणि उत्तरदायित्वाशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. शताब्दी समिट हे या दृष्टीने मार्गदर्शक ठरेल असे सीटीसीचे अध्यक्ष सीए जयंत गोखले यांनी सांगितले. उपाध्यक्ष सीए नेहा राजेन गडा, संयुक्त मानद सचिव सीए मेहुल शेट्टी व सीए अंकित संघवी तसेच मानद खजिनदार सीए वितांग शाह उपस्थित होते.
शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष सीए विपुल चोक्सी यांनी सांगितले की, परिषदेत भांडवली बाजार, स्टार्टअप्स, जीएसटी, संबंधित पक्ष व्यवहार, कर नियोजन तसेच व्यावसायिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर सखोल चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *