दुबईत दिव्यातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान
बालविकास क्षेत्रातील कार्याची आंतरराष्ट्रीय दखल
दिवा : Early Childhood Development Forum यांच्या वतीने दुबई येथील ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित विशेष समारंभात दिवा शहरातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात विशेषतः बालविकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला. या समारंभात एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचे सचिव स्वप्निल मारुती गायकर आणि विश्वस्त प्रणाल मारुती गायकर यांनी सन्मान स्वीकारला. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानामुळे संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे.
एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शैक्षणिक पद्धती, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि बालकेंद्रित उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे दिवा शहराच्या शैक्षणिक क्षेत्राचीही प्रतिष्ठा उंचावली आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
