भाजपा नगरसेवकाचा अनधिकृत बांधकामाला पाठिंबा
अशोक तिवारी यांची पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ
मिरा – भाईंदर : महापालिका आयुक्त यांनी आदेश दिल्यानुसार गेल्या काही दिवसापासून अनधिकृत फेरीवाले तसेच अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई शहरात सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कालपासून अनेक बार आणि हॉटेल्सच्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई सुरू आहे. सहाय्यकआयुक्त प्रियंका भोसले यांनी आज टी बारवर कारवाई केली आहे.
या मोहिमेअंतर्गत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक जय अंबे नगर, भाईंदर पश्चिम येथे पोहचलो असता त्यांनी विरोध करण्यात आला. भाजपाचे नगरसेवक अशोक तिवारी यांनी शिवीगाळ करत या पथकला रोखले.
यावेळी महापालिकेचे कर्मचारी हतबल झाल्याचे दिसून आले.
भाजप नगरसेवक अशोक तिवारी यांनी उघडपणे पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध अपशब्द वापरले.
मीरा भाईंदर महानगरपालिकेला पत्र लिहून अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्याचा दावा करणाऱ्या महापौर डिंपल मेहता यांच्या पक्षाच्या एका नगरसेवकाने अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले. यावर भाजपा अशोक तिवारींवर कारवाई त्यां काय कारवाई करतील की मूक भूमिका घेईल हे लवकरच दिसेल.
