इंदिरानगर विभागात आरक्षित भूखंडावर अनाधिकृत बांधकामे सुरूच

कारवाई करण्याची संघर्ष रहिवासी संघटनेची मागणी

कल्याण : टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर विभागात आरक्षित भूखंडावर अनाधिकृत बांधकामे सुरू असून या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी संघर्ष रहिवासी संघटनेच्या वतीने केडीएमसी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 2017 पासून महानगर पालिकेच्या आरक्षित भूखंड क 32 (म्युनसिपल हौसिग) आरक्षण के 33 (वेटनरी हॉस्पिटल) / आरसन क्र. 58 (म्युनसिपल क्वॉटर्स / आरक्षण के 59 (पार्किंग) व आरक्षण के 60 अमुझमेंट पार्क-मनोरंजन मैदान इंदिरानगर स्मशानभूमी रस्ता विभागात भूमाफियांकडून अनधिकृत घरांचे बांधकामे सतत सुरु आहेत. यामध्ये स्थानिक राज‌कीय नेते, केडीएमसी कर्मचारी यांचा सहभाग असल्याचा आरोप संघर्ष रहिवासी संघटनेने केला असून याठिकाणी कारवाई करून होत असलेले अनाधिकृत बांधकामे त्वरीत थांबवावी. या प्रकरणी केडीएमसीकडे वारंवार तक्रार करून देखील यावर कारवाई होत नसल्याने दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी संघर्ष रहिवासी संघटनेचे अध्यक्ष गणेश भाटे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *