संत सेवालाल महाराजांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहायक महसूल अधिकारी सुमेध राऊत व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
