मिरा – भाईंदर
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे डॉक्टरांच्या तात्काळ निर्णयक्षमतेमुळे आणि प्रगत कॅथेटर-आधारित उपचारामुळे २० वर्षीय तरुणाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आले. योग्य वेळी अचूक निदान आणि तज्ज्ञ उपचार मिळाल्यास किती गंभीर परिस्थितीतही जीव वाचू शकतो, याचे हे ठळक उदाहरण आहे. हा तरुण नेक्रोटायझिंग पॅनक्रियाटायटिस या गंभीर आजाराने त्रस्त होता. या आजारात स्वादुपिंडाचा काही भाग गंभीररीत्या बाधित होतो. उपचारादरम्यान अचानक त्याच्या डाव्या हातात वेदना आणि सूज आली. त्यानंतर त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. अवघ्या दोन दिवसांत त्याची प्रकृती इतकी खालावली की तो विश्रांतीत असतानाही धापा टाकू लागला.
तपासणीत त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण धोकादायकरीत्या 5६ टक्क्यांवर आले असल्याचे आढळले. पुढील तपासणीत डाव्या हातात डीप वेन थ्रॉम्बोसिस (DVT) असल्याचे स्पष्ट झाले. सीटी पल्मोनरी अँजिओग्राफीमध्ये दोन्ही मुख्य फुफ्फुसांच्या धमन्या मोठ्या रक्ताच्या गाठींमुळे जवळजवळ पूर्णपणे बंद झाल्याचे दिसून आले. ही अवस्था मॅसिव्ह पल्मोनरी एम्बोलिझम म्हणून ओळखली जाते आणि तातडीने उपचार न झाल्यास जीवघेणी ठरू शकते.
आपत्कालीन परिस्थितीत त्वरित निर्णय, आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवेचे महत्त्व अधोरेखित करते. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे वेळेवर मिळालेल्या उपचारामुळे एका तरुणाचा जीव वाचला आणि त्याला नव्या आयुष्याची संधी मिळाली.
०००००००
