ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट

कल्याण : ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. डोंबिवली येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनला सदिच्छा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांनी भेट देऊन ग्रंथांविषयी जाणून घेतले. ठाणे येथे १३ ठिकाणी, डोंबिवली येथे १० ठिकाणी, कल्याण येथे १ ठिकाणी, बदलापूर येथे ३ ठिकाणी, आणि अंबरनाथ येथे १ ठिकाणी, असे ग्रंथप्रदर्शन अन विक्री केंद्र जिल्ह्यात उभारण्यात आली होती.

जिल्ह्यातील ठाणे येथ कौपिनेश्वर मंदिर, खिडकाळेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शिव मंदिर आणि अन्य मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त पुजांचे आयोजन करण्यात आले होते.  सनातन संस्थेच्यावतीनेही महाशिवरात्रीनिमित्ताने ठाणे जिल्ह्यात २८ ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्यात आला. ठाणे येथील ग्रंथ प्रदर्शनाला भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भेट दिली त्यांनी मुंबई येथे होणाऱ्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी माहिती जाणून घेतली. जिल्ह्यातील प्रदर्शनाला मोठ्याप्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *