पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्या मंगळवारी १७ फेब्रुवारीला एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत असून मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईतील  वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान  दुपारी २.१५ वाजता मुंबईत येणार आहेत. त्यानंतर, दुपारी २.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात लोकभवन (यापूर्वीचे राजभवन) येथे द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. त्यानंतर, दुपारी ५ वाजता नरेंद्र मोदी आणि मॅक्रोन यांची हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंडटेबल चर्चा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल  करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया‘ परिसरात इंडोफ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *