मुंबई, दि. (प्रतिनिधी): येत्या शनिवार २१ व रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे महिला व पुरुष क्लासिक राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. योगेश गुंड, अनिल बरे आणि राजेश्री पेलणेकर यांची मुंबई जिल्ह्याचे कर्णधार व मुंबई जिल्ह्याचा संघ व व्यवस्थापक आणि कोच जितेंद्र यादव यांची नावे मानदसचिव समीर दळवी यांनी जाहीर केली आहेत. त्याचप्रमाणे मुंबईचा संघही जाहीर करण्यात आला आहे. मुंबई पुरूष संघात येनदेश कावले, योगेश गुंड, सुमित जैस्वाल, अखिल शेख, अनिरुद्ध शिंदे, बास्को लुईस, अभिषेक मौलिया, शादिल हळदे, निखिल दास, मुदस्सर खान, राजेश शेट्टे, राजेंद्र चव्हाण, यशवंत तावडे, मोहंमद शाबीर शेख, अनिल बरे, सुरेश कोळकर, राजेंद्र सावंत, नाताबार दास यांचा समावेश आहे तर मुंबई महिला संघात वैष्णवी चव्हाण, रतदा शिरोडकर, शितल पेटाटे, राजेश्री पेलणेकर, शहेजा मिश्रा , रूबी दास, स्वेता ढोलकिया, अली परवेझ यांचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंसाठी देखील स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात येईल. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना प्रशस्तीपत्रक आणि पदक देऊन गौरविण्यात येईल. नागरिक सहाय्य केंद्र विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. तर २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचा समारोप सोहळा होईल. महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत.स्पधेत ३०० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संजय सरदेसाई, मोबाईल क्रमांक ९३२०७२९९२७ यांच्याशी संपर्क साधावा.
००००००००
