शेवग्याच्या शेंगा विक्रीतून ग्रामीण भागात रोजगार
जीवनसत्व,घटकामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी
अविनाश उबाळे
मुंबई : शेवग्याच्या शेंगाचे यंदा विक्रमी उत्पादन झाले आहे.हिरव्यागार शेवग्याच्या शेंगा व पानं व फुलांमध्ये प्रचंड असे जिवनस्तव घटक व औषधी गुणधर्म आढळून येत असल्याने मोठ्या प्रमाणावर शेवग्याच्या शेंगाना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.या शेवग्याच्या शेंगा विक्रीतून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळत आहे.
ठाणे जिल्हयातील शहापूर,मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या तालुक्यात तसेच वासिंद, किन्हवली, डोळखांब,असनगाव,आटगाव, खर्डी,कसारा,या ग्रामीण भागातील बाजारपेठेत व आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर शेवग्याच्या शेंगा विक्रीसाठी येत आहेत.या शेंगा विक्रीतून आदिवासी,व गोरगरीब लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे.ग्रामीण भागात शेवगा वृक्ष हे शेत माळरान व गाव खेड्यावंर घराजवळ आढळून येतात.हिवाळ्या मोसमात शेवगा वृक्षाला फुलं बहरुन येतात आणि साधारण जानेवारी महिन्याच्या अखेरीस शेवग्याला हिरव्यागार शेंगांचा बहर आलेला पाहण्यास मिळतो.यंदा शेवग्याचे विक्रमी असे उत्पन्न असल्याचे या व्यवसायातील विक्रेते सांगतात.शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेवग्याच्या शेंगांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे.आठवडी बाजारात शेवग्याच्या शेंगांची मोठ्या प्रमाणावर विक्री होताना दिसत आहे.एका जूडीत सहा शेंगा अशाप्रकारे साधारण वीस रुपये जूडी अशी शेंगांची विक्री होत असल्याचे या व्यवसायातील विक्रेत्यांनी सांगितले. चांदरोटी येथील मंदा वेखंडे या विक्रेत्या दरवर्षी शेवग्याच्या शेंगा विक्रीतून रोजगार मिळवित आहेत.एकूण ७ शेवग्याच्या झाडांची लागवड त्यांनी आपल्या शेत माळरानावर केली आहे.या शेवग्याच्या लागवडीतून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.दररोज पाच ते सात किलो शेंगाची त्या शहापूर बाजारपेठेत विक्री करतात यातून त्यांना रोज हजार पंधराशे रुपयांची कमाई होते.साधारण दरवर्षी शेवग्याच्या विक्रीतून २० ते २५ हजार रुपये मिळतात असे मंदा वेखंडे यांनी बोलताना सांगितले.शेवग्या मध्ये भरपूर कॅल्शियम मिळते तसेच आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगाचा आहारात समावेश केल्याचे फायदे दिसून आलेले आहेत.शेवग्याच्या शेंगामध्ये लोह,व कॅल्शियम असते. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन्सचे भांडार शेवग्याच्या शेंगांत आढळतो.शेंगा खाण्याचे अनेक फायदे मेडीकल रिसर्च ने पुढे आले आहेत.शेंगाचा नियमित आहारात समावेश केल्यान केस गळती कमी होते.हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते.यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करते.आयुर्वेदानुसार, शेवग्याच्या शेंगा आणि त्याची फुलं,व पाने ३०० पेक्षा जास्त आजारांवर रामबाण उपाय ठरतात.यामुळे हिरव्यागार शेवग्याच्या शेंगाचा आहारात समावेश करण्यासाठी शेवग्याला ग्रामीण भागासह शहरांतील भाजी मंडईत ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.
