कुंडनपाडा धरण बांधले, कालवा कधी होणार?

शहापूरातील शेतकऱ्यांत संताप

अविनाश उबाळे

ठाणे – राज्य सरकारच्या जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शिरोळ येथे १५ वर्षांपूर्वी कुंडनपाडा धरण बांधले.मात्र धरणाला जोडलेल्या कालव्याचे काम अध्यापही पूर्ण झालेले नाही. गेली पंधरा वर्ष येथील शेतकरी सिंचनाची वाट पाहात आहेत.धरणाजवळील कालवा केव्हा पूर्ण करणार ? असा संतप्त सवाल आता शेतकरी राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाला विचारत आहेत.

शहापूर पासून ३५ किलोमीटर अंतरावरील शिरोळ या गावाजवळ कुंडनपाडा हे धरण राज्य सरकारच्या ठाणे (कळवा )जलसंधारण विभागाने २००५ साली बांधून पूर्ण केले.तत्कालीन जलसंधारण विभागाकडून धरणासाठी २ कोटी ७ लाख ७३ हजार ५५६ रुपये खर्च करण्यात आले होते.धरणाला जोडून कालव्याचे काम करण्यासाठी केवळ खोदकाम करण्यात आले.या धरणाला जोडून डावा कालवा १.२६ किलोमीटर तर उजवा कालवा १.२९ किलोमीटर असे अंदाजपत्रक बनविण्यात आले होते.कालव्याचे काम करण्यासाठी माती काढण्यात आली.मात्र कालव्याचे काम पूर्ण न करता ते अपूर्ण ठेवण्यात आले आहे.यामुळे जलसंधारण विभागाने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे काय ?असा संतप्त सवाल आता शेतकरी सरकारला विचारत आहेत.कालव्याचे काम पूर्ण करण्याकडे तत्कालीन जलसंधारण विभागाच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने कालव्यासाठी खोदलेल्या खड्डयात दगडमाती, चिखल, गवत, गाळ भरलेला दिसतो आहे.मागील १५ वर्षांपासून कुंडनपाडा धरणातून पाणी मिळेल,याकडे शेतकरी आपले डोळे लावून बसले आहेत मात्र कालव्याची रखडपट्टी ही सुरुच आहे.कुंडणपाडा धरणाची डागडुजी देखील करण्यात न आल्याने मातीचा भराव व दगडी पिंचिग ढासळत चालली आहे.याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *